अतिधोकादायक इमारतीवर पालिकेची कारवाई म्हणाले...

विविध कारणे देत ११६ इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अतिधोकादायक इमारतीवर पालिकेची कारवाई म्हणाले...

सी-वन, अर्थात अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करूनही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आले आहे. तर १०९ इमारतीतील रहिवाशांना इमारत रिकाम्या केल्या आहेत. तर विविध कारणे देत ११६ इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत ३३७ अतिधोकादायक इमारती असून, पावसाळ्यापूर्वी इमारत रिकामी करा, असे आवाहन पालिकेच्या वतीने रहिवाशांना करण्यात येते; मात्र अन्य ठिकाणी घराचा पर्याय उपलब्ध नाही, दुसरे घर घेणे शक्य नाही, अशी विविध कारणे देत ११६ इमारतीतील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत ११६ इमारतींचा प्रश्न प्रलंबित आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. यापैकी चार प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात, ७० प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in