मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी शिव योगा सेंटर सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी शिव योगा सेंटर सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय
Published on

मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी आता शिव योगा सेंटर सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या शिव योगा सेंटरच्या माध्यमातून मुंबईकरांना योगाचे धडे देण्यात येणार आहेत. योगाचे धडे घेण्यासाठी किमान ३० जणांचा ग्रुप गरजेचा असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून योगाचे धडे दिले जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी सांगितले. दरम्यान, योगाचे धडे देणाऱ्या एका प्रशिक्षकाला दोन तासांचे एक हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

वातावरणात होणारे बदल यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी शिव योगा सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक्तीला काही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात केल्यानंतर आरोग्य उत्तम राहावे यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वसामान्यांसह वृद्ध, सहव्याधी असणारे आणि तरुणांमध्येही योगाची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ही योगा केंद्रे सार्वजनिक सभागृहे, पालिका किंवा खासगी शाळा, मंगल कार्यालये, पालिकेच्या जागा, सार्वजनिक िठकाणी चालविण्यात येतील. शिव योगा सेंटर सुरू करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया सुरू असून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in