पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सल्लागाराला तब्बल ६५ लाख रुपये पालिका मोजणार आहे.
पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

कृत्रिम तलावांपैकी पवई तलाव एक आहे. पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यात येणार आहे; मात्र पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सल्लागाराला तब्बल ६५ लाख रुपये पालिका मोजणार आहे.

पवई तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पवई तलावात जाणारे सांडपाणी थेट जवळील मलनि:सारण वाहिनीत सोडण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र एकाच निविदाकारांने प्रतिसाद दिला. त्यामुळे पुन्हा एकदा निविदा प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in