पावसाळ्यातील वाढत्या आजारांसाठी महानगरपालिका सज्ज

रुग्णालयासोबत सर्वसाधारण आणि उपनगरीय रुग्णालयामध्ये १५०० बेड सज्ज ठेवण्यात आले
पावसाळ्यातील वाढत्या आजारांसाठी महानगरपालिका सज्ज

कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच आता पावसाळी आजार डोके वर काढू लागले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश आरोग्य आणि कीटक नाशक विभागाला देण्यात आले. पावसाळी आजारासाठी पालिकेच्या मुख्य रुग्णालयासोबत सर्वसाधारण आणि उपनगरीय रुग्णालयामध्ये १५०० बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

पावसाळा सुरु झाल्याने डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, चिकनगुनीया यांसारखे पावसाळी आजार डोके वर काढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना थोपविण्यासाठी पालिकेने सर्वांतो परी तयारी केली आहे. जनजागृती करण्यासोबत बेड सज्ज ठेवले आहेत तर औषधाचा देखील पुरेसा साठा पालिकेने तयार ठेवला आहे. पालिकेच्या मुख्य नायर,सायन,केईएम,कूपर,कस्तुरबा या मोठ्या रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांत रुग्णशय्या तसेच पर्याप्त कर्मचारी वर्ग तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना काळात बंद करण्यात आलेली 'आरोग्य शिबीर' पुन्हा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. दर रविवारी किंवा आठवड्यातून दोन वेळा आरोग्य शिबीर घेण्यात येईल. झोपडपट्टी परिसरात शिबीर घेण्याचा विचार असल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in