दादरच्या प्राणीसंग्रहालयाला पालिकेची नोटीस

१५ दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडा; अन्यथा कारवाई
दादरच्या प्राणीसंग्रहालयाला पालिकेची नोटीस

मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील पालिकेच्या जलतरण तलावा शेजारी प्राणीसंग्रहालय आहे. या प्राणीसंग्रहालयात पत्र्याचे शेड, बाबींचे शेड, अशी बेकायदा बांधकामे झाल्याचा ठपका ठेवत पालिकेच्या जी उत्तर विभागाने एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावली आहे. पुढील १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडले नाही, तर पालिका कारवाई करेल, असे ही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

पालिकेच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलावात ३ ऑक्टोबर रोजी मगरीचे पिल्लू आढळून आले होतो. ते शेजारच्या प्राणी संग्रहालयातून आले असल्याचा दावा मनसेने केला आहे. हे प्राणी संग्रहालय येथून हटवण्याची मागणीही मनसेने केली असून, त्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्यातच पालिकेने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मगरीचे पिल्लू शेजारील प्राणीसंग्रहालयातून आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने प्राणीसंग्रहालया विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवाजी पार्क पोलिसांनी वन विभागाकडे तक्रार वर्ग केल्यानंतर वन विभागाने प्राणीसंग्रहालयाला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता प्राणीसंग्रहालयात बेकायदा पत्रा शेड उभारली, विटांचे कच्च बांधकाम, बाबींचे शेड अशा प्रकारचे बेकायदा बांधकामे केली आहेत. पालिकेच्या जी उत्तर विभागाने ५३,५४,५५ व ५६ कलमा अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याचे जी उत्तर विभागाकडून सांगण्यात आले.

विविध जलचर, प्राण्यांचे पिंजरे

प्राणीसंग्रहालयात विविध जलचर, प्राण्यांचे पिंजरे उभारण्यात आले असून, त्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. पिंजऱ्यांसाठी बांबू व पाॅलिथिनचा वापर करून सात ते आठ प्रकारच्या शेड बांधण्यात आल्या आहेत. त्या अवैध असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. याबाबत ही नोटीस असल्याची माहिती पालिकेच्या दादर जी उत्तर विभाग कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in