
यंदाची प्रभाग आरक्षण सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हरकती सूचनांमध्ये विशेष करुन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करण्यात आल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर २३२ हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण द्या, गेल्या दोन निवडणुकीत महिला आरक्षण होते. पुन्हा महिला आरक्षण जाहीर झाल्याने पुरुषांनी कुठून निवडणूक लढवायची, अशा प्रकारच्या हरकती सूचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, १३ जून सोमवारी आयुक्त हरकती सूचना वाचून अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत.
प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर १ ते ६ जून दरम्यान हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. सहा दिवसांत २३२ हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. धारावी विभागात एससीला आरक्षण देण्यात आल्याने दुसऱ्याला संधी कधी मिळणार, आता एसीची लोकसंख्या आहे ती २२७ प्रभागांवेळी होती, महिलांना आरक्षण दिल्याने पुरुष उमेदवारांनी कुठून निवडणूक लढायची अशा सूचना प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.