लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा प्लॅन ४-डी

उंदरांचा गृहप्रवेश रोखण्यासाठी ४-डी पद्धत
लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा प्लॅन ४-डी

मुंबई : लेप्टोच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी आता ४-डी पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या नवीन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी मुंबईकरांच्या सहकार्याची गरज आहे. तसेच घरात उंदरांचा गृहप्रवेश रोखण्यासाठी ४-डी पद्धतीचा वापर करा, असे आवाहन पालिकेच्या किटकनाशक विभागाने केले आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, कावीळ व चिकनगुनिया या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग, किटकनाशक विभाग दिवसातील २४ तास कार्यरत आहे. पालिका रुग्णालयात तीन हजार बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तर लेप्टोचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी किटकनाशक विभागाने ४-डी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. लेप्टोच्या फैलावास कारणीभूत उंदराचा शोध घेत नायनाट करण्यात येतो. जानेवारी ते आतापर्यंत ४ लाख उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. उंदीर मारणे हा शेवटचा पर्याय असून उंदराचा घरात, कार्यालयात शिरकाव होऊ नये यासाठी उंबरठा उंच करणे, एसीच्या पाईपमधील पोकळी भरणे, घर परिसरात उंदराला खाण्यास काही देऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

४-डी पद्धत महत्वपूर्ण

* घरात उंदरांचा शिरकाव होऊ नये यासाठी दरवाजा उंबरठा उंच करणे

* उंदराला लपण्यासाठी जागा मिळेल असे अडगळीत सामान ठेवू नका

* जगण्यासाठी खाणं गरजेचे असले तरी उंदराला खाद्यपदार्थ घालणे बंद करा

* उंदीर घरात शिरला तर पकडण्यासाठी पिंजरा ठेवा

* शेवटचा पर्याय म्हणजे उंदराला विष देणे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in