महिला बचत गटांना पालिकेचा आधार; स्वयंरोजगारासाठी २५ हजारांची आर्थिक मदत

महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन घरघंटी मसाला कांडप आदी वस्तूंचे वाटप करण्यात येते
महिला बचत गटांना पालिकेचा आधार;
स्वयंरोजगारासाठी २५ हजारांची आर्थिक मदत

मुंबई : महिला बचत गटांना आठवडी बाजारात हक्काची जागा उपलब्ध केल्यानंतर आता आर्थिक मदत मिळणार आहे. महिला बचत गटांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. प्रत्येक सभासदास २ हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम दिली जाणार आहे.

महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन घरघंटी मसाला कांडप आदी वस्तूंचे वाटप करण्यात येते. मात्र आता महिला बचत गटांना थेट अर्थसहाय्य मिळणार आहे. महिला व बाल कल्याण योजनेेंतर्गत एकूण ९०८ बचत गटांना खेळते भांडवल म्हणून २ कोटी २७ लाख रुपयांचा निधीची आवश्यकता असून प्रति बचत गट २५ हजार रुपये याप्रमाणे हे अनुदान स्वरूपात देण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

राज्य व केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या स्वयंसहाय्यता गटांना राज्य अभियान संचालकामार्फत प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करून दिला जातो. घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, नाका कामगार आदींच्या स्वयंसहाय्यता बचत गट तयार करून या योजनेंतर्गत १० हजार रुपयांचे अनुदान राज्य अभियान संचालकामार्फत देण्यात येत असल्याने उर्वरीत १५ हजार रुपयांचे अनुदान महापालिकेच्या जेंडर बजेटअंतर्गत उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे जेंडर बजेट अंतर्गत अभियानाच्या एकूण ५२० बचत गटांना हे अतिरिक्त खेळते भांडवल देण्यात येणार असून, यासाठी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in