Mumbai : तंत्रज्ञान सज्जतेअभावी BMC चे महिला सुरक्षा ॲप बासनात; माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती घोषणा

मुंबई महापालिकेच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात येणार होती. तशी घोषणा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, पालिकेच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या ॲपसाठी पालिकेचे माहिती व तंत्रज्ञान विभाग अजून सज्ज नाही.
Mumbai : तंत्रज्ञान सज्जतेअभावी BMC चे महिला सुरक्षा ॲप बासनात; माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती घोषणा
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात येणार होती. तशी घोषणा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, पालिकेच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या ॲपसाठी पालिकेचे माहिती व तंत्रज्ञान विभाग अजून सज्ज नाही. यामुळे हे महिला सुरक्षा ॲप बासनातच गुंडाळले असल्याचे चित्र आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने २०२४ -२५ साली महिला सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात येणार होती. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला हे ॲप विकसित करणे शक्य झाले नाही. यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने संपर्क होऊ शकला नाही.

हे मुद्दे असणार होते ॲपमध्ये

महिलांना स्वसंरक्षण करण्याकरिता प्रशिक्षण

शासनाच्या विविध योजनांबद्दल प्रचार प्रसिद्धी करणे

डिजीटल सुरक्षा ॲप बनविणे

संकटग्रस्त महिलांकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा एका छताखाली पुरविणे

महिलांकरिता असणाऱ्या कायद्यांबाबत जागृती करणे

महिला सुरक्षेच्या अनुषंगाने इतर आवश्यक उपक्रम व उपाययोजना

logo
marathi.freepressjournal.in