सणासुदीच्या काळात पालिका 'अलर्ट' मावा-मिठाई विक्रेते रडारवर; विषबाधेचे प्रकार टाळण्यासाठी होणार तपासणी

सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही
सणासुदीच्या काळात पालिका 'अलर्ट' मावा-मिठाई विक्रेते रडारवर; विषबाधेचे प्रकार टाळण्यासाठी होणार तपासणी

मुंबई : सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मावा-मिठाई विक्री होते. मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नयेत यासाठी मावा-मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांनी मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असे सक्त निर्देश पालिका प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, खाद्यपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते सण-उत्सवांच्या कालावधीत विशेष खबरदारी घेत असते. मुंबई शहरात मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषबाधा होऊ नये म्हणून महापालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांनी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

जनजागृती मोहीम राबवा!

सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही, यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपापल्या विभागांत मिठाई विषबाधेबाबतच्या भित्तीपत्रकांचे वाटप करावे, जनजागृती करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

...तर आरोग्य विभागाला कळवा

मिठाईचा रंग बदलत असल्यास, उग्र वास येत असल्यास अथवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in