गणपती विसर्जनासाठी पालिका सज्ज ; २०० कृत्रिम तलावांची केली निर्मिती

विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विसर्जन स्थळे(कृत्रिम तलाव) तयार केली आहेत
गणपती विसर्जनासाठी पालिका सज्ज ;  २०० कृत्रिम तलावांची केली निर्मिती

दहा दिवसांचा पाहुचार घेतल्यावर आज बाप्पा निरोप घेणार आहे. पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणेशभक्तांकडून लाडक्या बाप्पाल साद घातली जात आहे. अख्खा देश गेल्या दहा दिवसांपासून बाप्पामय झाला आहे. वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.यासाठी मंडळांची जय्यत तयारी सुरु आहे. देशासह जगभरात महाराष्ट्राची ओळख बनलेल्या गणेश उत्सवाचा शेवटचा आज शेवटचा दिवस उजाडला आहे.

दहा दिवस गणपती बाप्पाची मोठ्या थाटामाटात आणि मनोभावे पूजा केल्यानंतर गुरुवार (28 सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशीला लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतो.

मुंबईसह राज्याच्या अन्य भागात गजाननाचे नद्या, तलाव आणि इतर जलाशयांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विसर्जन स्थळे(कृत्रिम तलाव) तयार केली आहेत. मुंबईत एकूण 273 विसर्जन स्थळे तणपतीच्या विसर्जनासाठी बांधण्यात आली आहेत. त्यात 73 नैसर्गिक आणि सुमारे 200 कृत्रिम तलावांचा समावेश आहे. चौपाटीवर विसर्जनाच्या वेळी व्हीआयपीही बाप्पाला निरोप देण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in