महसुलासाठी पालिका आता नारळ विकणार; नारळ काढण्यासाठी स्पेशल लेबरचा शोध

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेवर नारळाची झाडे आहेत. नारळाच्या झाडावरील नारळ पडून अपघात होऊ नये, नारळाचे पाणी पिण्यासाठी उपयुक्त असते
महसुलासाठी पालिका आता नारळ विकणार;
नारळ काढण्यासाठी स्पेशल लेबरचा शोध

मुंबई : मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. या जागांवर मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे असून झाडांवर वाढलेले नारळ काढून ते विकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नारळाच्या झाडावरील नारळ काढण्यासाठी स्पेशल लेबरची गरज असून तीन वर्षांसाठी कंत्राट देण्यात येणार आहे. यातून मुंबई महापालिकेला महिन्याला दोन ते तीन लाखांचा महसूल अपेक्षित आहे.

मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात एकूण २९ लाख झाडे आहेत. यात मुंबई महापालिकेच्या जागेवर ४० ते ५० हजार नारळाची झाडे आहेत. परंतु वेळीच नारळ काढता येत नसल्याने नारळ पडून अपघात होण्याची शक्यता असते. नारळ वाया जाऊ नये आणि नारळ पडून अपघात होऊ नये, यासाठी नारळ काढून ते विकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र नारळाच्या झाडावरील नारळ काढण्यासाठी कामगार तरबेज असणे गरजेचे आहे. केरळमध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असून त्या ठिकाणी नारळ काढण्याचा कामगारांना अनुभव आहे. मुंबईत नारळविक्री करणारे बहुतांश केरळमधील आहेत. मुंबई महापालिकेच्या जागांवर नारळाची झाडे असून ते नारळ काढून विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. कुशल तरबेज कामगार पुरवणाऱ्या पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेवर नारळाची झाडे आहेत. नारळाच्या झाडावरील नारळ पडून अपघात होऊ नये, नारळाचे पाणी पिण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे नारळाच्या झाडावरील नारळ काढून ते विक्री करणाऱ्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नारळ विक्रीतून मुंबई महापालिकेला महिन्याला दोन ते तीन लाखांचा महसूल अपेक्षित आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in