समुद्र किनारी सी फूडची मेजवानी ; बेरोजगारांना काम, कोळी संस्कृतीला प्रोत्साहन; पालिकेचा फूड ऑन व्हिल उपक्रम

कुलाबा व कफ परेड येथे फूड ऑन व्हील या उपक्रमा अंतर्गत नॉनव्हेजवर ताव मारता येणार आहे
समुद्र किनारी सी फूडची मेजवानी ; बेरोजगारांना काम, कोळी संस्कृतीला प्रोत्साहन; पालिकेचा फूड ऑन व्हिल उपक्रम

दक्षिण मुंबईतील समुद्र किनारी येता लज्जतदार नॉनव्हेजवर ताव मारायला मिळणार आहे. पापलेट, सुरमई फ्राय, कोलंबी, बोंबील, खेकड्याची चटणी याचा आस्वाद घेता येणार आहे. कोळी बांधवांकडून समुद्रकिनारी सी फूडची मेजवानी चाखायला मिळणार आहे. कुलाबा व कफ परेड येथे फूड ऑन व्हील या उपक्रमा अंतर्गत नॉनव्हेजवर ताव मारता येणार आहे. कोळी बांधवांच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासह बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फक्त कोळी बांधवांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी असा अथांग समुद्र मुंबईला लाभला आहे. त्यामुळे मायानगरी मुंबईला पर्यटकांची पहिली पसंती आहे. मुंबई नव्हे, तर देशविदेशातील पर्यटक मुंबईची सैर करण्यासाठी येत असतात. मुंबईला लाभलेला अथांग समुद्र किनारी पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. आता मात्र समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना नॉनव्हेजवर ताव मारता येणार आहे. कोळीबांधव मुंबईचा भूमिपुत्र त्यामुळे कोळी बांधवांकडून सी फूडचा आस्वाद लुटता यावा यासाठी फूड ऑन व्हील हा उपक्रम राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सुरुवातीला कुलाबा व कफ परेड येथे फूड स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना नॉनव्हेजचा आस्वाद घेता येणार आहे.

माहीम, वरळी, बधवार पार्कला नवा साज

-कोळीवाड्यांच्या सौंदर्यीकरणाचा उपक्रम पालिकेने हाती घेतला असून, वरळी, माहीम, बधवार पार्कचे काम सुरू करण्यात आले आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू आहेत.

-‘फूड ऑन व्हील’ उपक्रम जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ३४ लाख ५१ हजारांचा खर्च करण्यात येणार आहे. उपआयुक्त संगीता हसनाळे यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला आहे.

पर्यटन वाढीसाठी बोटी

कोळीवाडे सौंदर्यीकणाच्या उपक्रमात पर्यटन वाढीसाठी बोटींच्या सफरीचा उपक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. यासाठी बोटीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘फूड ऑन व्हील’ उपक्रम राबवण्यात येईल. सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in