‘मुरंजन-२४’च्या अंतिम फेरीत कोण बाजी मारणार? आंतरमहाविद्यालयीन एकांकिका महोत्सवाची अंतिम फेरी २३ जानेवारी रोजी

सिडनहॅम नाट्य मंडळ हे महाविद्यालयाचे सर्वात जुने मंडळ असून गेल्या ८७ वर्षापासून ते कार्यरत आहे. स
‘मुरंजन-२४’च्या अंतिम फेरीत कोण बाजी मारणार? आंतरमहाविद्यालयीन एकांकिका महोत्सवाची अंतिम फेरी २३ जानेवारी रोजी

मुंबई : सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय चर्चगेट मुंबई द्वारा आयोजित 'मुरंजन-२४' या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका महोत्सवाची अंतिम फेरी २३ जानेवारी रोजी मराठी साहित्य संघ, चर्नी रोड मुंबई येथे होणार आहे.

'महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त नाट्य कलागुणांना वाव देऊन ते विकसित करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे' हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरे यांनी स्पष्ट केले.

सिडनहॅम महाविद्यालय हे आशिया खंडातील प्रथम वाणिज्य महाविद्यालय असून त्याची स्थापना १९१३ साली झाली आणि २०१९ या वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पहिले राज्य विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात घटक महाविद्यालय म्हणून सिडनहॅम महाविद्यालयाचा समावेश झाला आहे.

सिडनहॅम नाट्य मंडळ हे महाविद्यालयाचे सर्वात जुने मंडळ असून गेल्या ८७ वर्षापासून ते कार्यरत आहे. सदर नाट्यमंडळाद्वारे दिवंगत प्राचार्य डॉ. एस के मुरंजन यांची नाटकांविषयी असलेली आवड लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ मुरंजन एकांकिका स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. मध्यंतरी कोविड काळात या परंपरेत खंड पडला होता परंतु प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरे यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली नाट्य मंडळाच्या प्रभारी प्राध्यापिका डॉ . स्मिता कुंटे आणि नाट्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी या स्पर्धेचे उत्साहाने आयोजन केले आहे. विविध महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यापैकी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, खालसा स्वायत्त महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय, भवन्स महाविद्यालय चौपाटी आणि के ई एस श्रॉफ या पाच महाविद्यालयांनी अंतिम फेरीत मानांकन मिळवले आहे. एकापेक्षा एक सरस अशा या एकांकिकांमध्ये चुरशीची लढत होऊन अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in