पूर्ववैमस्नातून सुरक्षारक्षकाची हत्या; मारेकऱ्याला अटक

मारेकऱ्याला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
पूर्ववैमस्नातून सुरक्षारक्षकाची हत्या; मारेकऱ्याला अटक

मुंबई : पूर्ववैमस्नातून राजेशकुमार रमाशंकर शुक्ला या ३५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाची झोपेतच पेव्हर ब्लॉकने हल्ला करून हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. जयशंकर लक्ष्मीकांत मिश्रा ऊर्फ मिश्रा असे या मारेकऱ्याचे नाव असून, अटकेनंतर त्याचा ताबा सांताक्रुझ पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. ही घटना गुरुवारी २८ सप्टेंबरला मध्यरात्री दोन ते चारच्या सुमारास सांताक्रुझ येथील दिलखुश सोसायटीच्या रियालिटी डायग्नोस्टिकसमोर घडली. याच ठिकाणी राजेशकुमार हा सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. जयशंकर हा त्याच्या परिचित असून, ते दोघेही एकाच गावचे रहिवाशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा जयशंकरच्या मनात राग होता. गुरुवारी रात्री राजेशकुमार हा साईटवर झोपला होता. यावेळी तिथे जयशंकर आला आणि त्याने झोपेतच राजेशकुमारच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in