चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक

तिच्या हत्येनंतर तिचा पती पळून गेला होता
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून दीपा राजेश यादव या महिलेची तिच्याच पतीने हत्या करून पलायन केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. राजेश यादव असे या आरोपी पतीचे नाव असून, अटकेनंतर त्याला कांजूरमार्ग पोलिसाकडे सोपिवण्यात आले आहे.

कांजूरमार्ग येथे दीपा ही तिचा टेम्पोचालक पती राजेश यादवसोबत राहत होती. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता; मात्र तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. याच वादातून राजेशने दीपाची हत्या करून तिचा मृतदेह कापडी पट्टीने बांधून बेडशीटमध्ये गुंडाळून पलायन केले होते. मंगळवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती कांजूरमार्ग पोलिसांना सांगितली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासात तो मृतदेह दीपाचा होता, तिच्या हत्येनंतर तिचा पती पळून गेला होता. त्यामुळे कांजूरमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेशचा शोध सुरू केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in