Mumbai Crime :लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनेच केली हत्या ; करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे

हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून या इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते
Mumbai Crime :लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनेच केली हत्या ; करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे

मीरा रोड येथे राहणाऱ्या तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तिच्या मित्राने ही हत्या केली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. मीरा रोड येथील गीता आकाश दीप, गीता नगर येथे सातव्या मजल्यावर मनोज सहानी (५५) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.


रात्री नऊच्या सुमारास शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. बुधवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता त्यांना सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे फक्त पाय आढळले. हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून या इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. आरोपी सहानी याचे बोरिवली येथे दुकान आहे. आरोपी सहानी याने करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. त्याने मृतदेहाचे अवयव कुठे फेकले याचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in