महिलेला सरबत पाजून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, आरोपींनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे म्हटले आहे.
महिलेला सरबत पाजून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

मुंबई : गोवंडी येथील एका २९ वर्षीय तरुणाला त्याच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेला सरबत पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब बोरकर असे या व्यक्तीचे नाव असून, तो गोवंडीतील बैगनवाडी येथील रहिवासी आहे.

३० वर्षीय पीडितेला जानेवारी २०२१ मध्ये त्याच्या आजारी आईला मदत म्हणून बोरकर यांच्या घरी कामावर ठेवले होते. पीडित महिला रोज कामासाठी त्याच्या घरी जात होती. ऑगस्टमध्ये त्याने तिला कॉल करून त्याच भागात असलेल्या एका नर्सिंग होमच्या मागे बोलावले होते. तिथे त्याने तिला 'रूह अफ्जा' पाजली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेवर अत्याचार केले होते. याबाबत जास्त काही आठवत नसल्याचा दावा पीडितेने केला होता. तसेच आरोपीने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ अत्याचार वेळी काढले होते. त्याचा वापर करीत तो तिच्याविरोधात वापरत होता. तसेच ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत होता. पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, आरोपींनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी रात्री त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in