कररचनेचा इतिहास,भारतीय कला, वारसा सांगणारे संग्राहालय गोव्यात तयार

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज गोव्यात ‘धरोहर’-राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे राष्ट्रार्पण
कररचनेचा इतिहास,भारतीय कला, वारसा सांगणारे संग्राहालय गोव्यात तयार

केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या हस्ते ‘धरोहर- राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे' गोव्यात राष्ट्रार्पण करण्यात आले. “धरोहर’ मध्ये एकूण आठ प्रेक्षक दीर्घा (गॅलरी) असतील. संग्रहालयाची ओळख करुन देणारी, कररचनेचा इतिहास सांगणारी, आर्थिक आघाड्या सांभाळणाऱ्या कामांविषयीची, भारतातील कला आणि वारसा जपणारी, भारतातील निसर्ग-प्राणीसृष्टीचे रक्षण करणारी, आपल्या सामाजिक कल्याणाची विश्वस्त असणारी आणि भारतीय अप्रत्यक्ष कराचा प्रवास- मीठावरील करापासून जे जीएसटी पर्यंतचा प्रवास सांगणारी दीर्घा आहे.

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज गोव्यात ‘धरोहर’-राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे राष्ट्रार्पण झाले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि गोव्याचे वाहतूक, पर्यटन आणि पंचायत राज मंत्री मॉउवीन गुडीन्हो यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून वित्त मंत्रालय ६ ते १२ जून या कालावधीत, आयकॉनिक वीक साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यात शनिवारी हा कार्यक्रम झाला. हा राष्ट्रार्पण सोहळा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यात, अर्थमंत्र्यांनी हे संग्रहालय ज्या इमारतीत आहे, त्या ४०० वर्षे जुन्या वास्तूमध्ये स्थापन असलेल्या एकाच प्रकारच्या दगडातून बनवण्यात आलेल्या शिल्पकृतीवरील सोनेरी वाळू बाजूला सरकवून हे उद्घाटन केले. या दुमजली निळ्या इमारतीचे आधीचे, म्हणजे पोर्तुगीज काळातील नाव ‘अल्फांडेगा’ असे होते. गेल्या ४०० वर्षांपासून ही इमारत मांडवी नदीच्या काठी उभी आहे.

‘धरोहर’ हे भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू संग्रहालय आहे, जिथे भारतीय सीमाशुल्क विभागाने, तस्करी, चोरी होत असतांना जप्त केलेल्या देशातल्या प्राचीन मूर्ती आणि इतर स्थापत्य वस्तू तर ठेवण्यात आल्या आहेतच; त्याशिवाय, देशाच्या आर्थिक आघाड्यांचे, देशाच्या वारशाचे, सौंदर्याचे आणि समाजाचे रक्षण करताना, भारतीय सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवायांची माहिती देखील इथे बघायला मिळेल. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे.

या धरोहर संग्रहालयाचे खास सामर्थ्य आणि वैशिष्ट्य म्हणजे, तिथली, ‘बॅटल ऑफ विट्स’ गॅलरी म्हणजे, मेंदूच्या, बुद्धिकौशल्याची लढाई सांगणारी दीर्घा. नावाप्रमाणेच, यात तस्कर आणि सीमाशुल्क अधिकारी यांच्यातल्या बुद्धिकौशल्याच्या लढाईची रोचक माहिती आहे. तसेच, यात, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलेली प्राचीन नाणी, मूर्ती, धोकादायक स्थितीतील दुर्मीळ प्राणी, हत्यारे आणि अमली पदार्थ अशा सगळ्या वस्तूंचा समावेश असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in