नारायण राणे यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, 'अधीश' वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु

राणेच्या पत्नी नीलम आणि मोठा मुलगा निलेश संचालक असलेल्या 'आर्टलाईन प्रॉपर्टीज' या कंपनीच्या नावे ही नोटीस पाठवण्यात आली होती
नारायण राणे यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, 'अधीश' वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु

जुहू येथील अधीश बंगल्याविरोधात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तोडकामाच्या आदेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन नव्याने आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर गुरुवारी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने आलिशान निवासस्थान असलेल्या अधीश बंगल्याविरोधात नोटीस बजावली. राणेच्या पत्नी नीलम आणि मोठा मुलगा निलेश संचालक असलेल्या 'आर्टलाईन प्रॉपर्टीज' या कंपनीच्या नावे ही नोटीस पाठवण्यात आली होती. या कंपनीत राणेंचे बरेच शेअर्स असल्याने कंपनीच्या मालकीच्या या बंगल्यात राणेंचे वास्तव्य आहे. या ११ मजली इमारतीत राणेंनी बरंचसे बांधकाम नियमबाह्य पद्धतीने केल्यामुळे ते बेकायदेशीर असून पाडावे लागेल असा इशारा नोटीसीमार्फत दिला आहे. मात्र, या नोटीसीला राणेंकडून तात्काळ आव्हान देण्यात आले. त्याची दखल घेत न्यायालयाने पालिका प्रशासनाला २४ जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश दिले होते.

त्यानंतर, इमारतीचे बांधकाम नियमित करण्यासाठी राणेंनी पालिकेत अर्ज दाखल केला. तो अर्ज ३ जून रोजी पालिकेने फेटाळून लावला. पुढील दोन दिवसात न्यायालयाने दिलेले संरक्षण संपुष्टात येत असल्याने राणेंनी उच्च न्यायालात नव्याने याचिका दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in