संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; पुस्तक प्रकाशन निमंत्रणासाठी सिल्व्हर ओकवर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर रविवारी भेट घेतली.
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; पुस्तक प्रकाशन निमंत्रणासाठी सिल्व्हर ओकवर
Published on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर रविवारी भेट घेतली. संजय राऊत यांनी ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले असून पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत आल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

रोहन तावरे यांनी वन्य जीवनावर आधारित लिहिलेल्या पुस्तकावर भेटीदरम्यान चर्चा झाली. राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या, असे शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे.

१७ मे रोजी पुस्तक प्रकाशन

‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in