नसीम खान यांची नाराजी दूर होईना; मनधरणीचे प्रयत्न सुरूच

काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे...
नसीम खान यांची नाराजी दूर होईना; मनधरणीचे  प्रयत्न सुरूच

प्रतिनिधी/मुंबई

काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने एकाही अल्पसंख्यांक व्यक्तीला उमेदवारी न दिल्याबददल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील प्रयत्न सोमवारीही कायम होते. खान यांची नाराजी दूर करण्यासाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी आदींनी त्यांची भेट घेऊन मनधरणी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या नसीम खान यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाने जाहीर केलेल्या आतापर्यंतच्या यादीत महाराष्ट्रात अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट केले होते. नसीम खान यांच्या या भूमिकेमुळे पक्षासमोर अडचण निर्माण झाली आहे.

वर्षा गायकवाड यांनीदेखील नसीम खान यांची भेट घेतली होती. नसीम खान हे माझे मोठे भाऊ असून त्यांची नाराजी नक्कीच दूर होईल, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला होता. आता चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप आणि सुरेश शेट्टी यांसारख्या पक्षातील मोठ्या नेत्यांनी नसीम खान यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in