नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून भरला फॉर्म

नाशिक शिक्षक - पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड पाहायला मिळाली.
नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून भरला फॉर्म

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने ३ वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत आपल्या मुलाचा, सत्यजित तांबेचा अर्ज दाखल केला. तेही अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने सर्वांनाच धक्का बसला. यावर सत्यजित तांबे म्हणाले की, "मी काँग्रेसचाच उमेदवार आहे, पण शेवटपर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला." असे मत त्यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात सुधीर तांबे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "सत्यजित तांबे राज्यातील तरुण मुलांचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांच्यामध्ये एक दूरदृष्टी असलेले एक युवानेतृत्त्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये सखोल ज्ञान आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये हे नेतृत्व द्यावे, असा निर्णय आम्ही घेतला." असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, "मला या निर्णयाबाबत काही माहिती नाही. या संदर्भातील सविस्तर माहिती घेऊनच प्रतिक्रिया देईन" असे त्यांनी सांगितले.

सत्यजित तांबे हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "मी भाजपसोबत जाणार, अशी माहिती नेमकी कुठून मिळते? हे कळत नाही. अद्याप कुठल्याही भाजप नेत्यांना भेटलो नसून त्यांची माझ्यासोबत अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. यानंतर फक्त पाठिंब्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहे. बाकी इतर चर्चांवर मी विश्वास ठेवत नाही." असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in