Nashik : संजय राऊतांना शिवसेना संपवयचीय; शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा दावा

संजय राऊत दर विकेंडला येतात आणि पैसे घेऊन जातात; नाशिकच्या (Nashik) पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप
Nashik : संजय राऊतांना शिवसेना संपवयचीय; शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा दावा

अगदी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) शिवसेना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) अंदाजे ५०हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये (Eknath Shinde) प्रवेश केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे टीका करताना म्हणाले होते की, कोणीही येडे गबाळे पकडतात आणि पदाधिकारी म्हणून प्रवेश करून घेतात. यावरून आज शिंदे गटात प्रवेश केलेल्या या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.

शिंदे गटामध्ये गेलेले पदाधिकारी म्हणाले की, "संजय राऊत यांनी कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही. ते रोज शरद पवारांकडे जातात आणि शिवसेना कशी संपवायची? याची योजना करून रोज सकाळी १० वाजता माध्यमांसमोर येतात, हेचि त्यांची लायकी आहे." अशी टीका करत त्यांनी संजय राऊतांवर घणाघात केला. त्यांच्यातील एका पदाधिकाऱ्याने असा दावा केला की, संजय राऊत हे केवळ शनिवार-रविवारी बडोदरा कंपनीचा हिशोब घ्यायला नाशिकला येतात.

ते पदाधिकारी पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घराघरात पोहचून धडाडीने काम करत आहेत. त्यामुळे खरे शिवसैनिक कोण? याचा विचार करा. संजय राऊत नाशिकमध्ये आल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये त्यांच्या स्वागतासाठी जातात. कोणीही शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी जात नाही. याचे आत्मपरीक्षण करण्याची त्यांना गरज आहे" असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in