मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कर्ज वसुली न्यायाधिकरण-३ (डीआरटी-३), मुंबई येथे प्रभारी अध्यक्ष श्रीकला सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोकअदालतीत १२२ प्रकरणांचा सौहार्दाने निपटारा करण्यात आला आणि रु. ४३.६९ कोटींची वसुली करण्यात आली. लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी (DLSA) सल्लामसलतीने आयोजित करण्यात आली होती.
लोकअदालतीचे अध्यक्षपद माजी अध्यक्ष व्ही. एन. लोधे-पाटील यांनी भूषविले.
पॅनेल सदस्य म्हणून कॅनरा बँकेचे डीजीएम सुधांशु एस. साहू आणि अधिवक्ता सुनील हम्बरे उपस्थित होते. डीआरटी-III, मुंबईचे निबंधक संजय जायसवाल यांनी सांगितले की, लोकअदालतीचे सुरळीत आयोजन करण्यासाठी न्यायाधिकरणातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या लोकअदालतीत डीआरटी-३, मुंबईतील स्नेहल तळाशीलकर (सहाय्यक निबंधक), पर्वेश शर्मा, मिलिंद खातू, सतीश बोराडे, राजन कांबळे, नरेंद्र महामुंकर, पवन मीणा, प्रवीण लबडे, किशोर इंदुलकर, अमरेंद्र आणि प्रियांका गुरव या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.