नवी मुंबईत फ्लेमिंगो शिल्पाकृतीचा राष्ट्रीय विक्रम

अनेक समुद्र ओलांडून नवी मुंबईत येणारे रोहित पक्षी (फ्लेमिंगो) हे नवी मुंबईचे आकर्षण स्थान आहे
 नवी मुंबईत फ्लेमिंगो शिल्पाकृतीचा राष्ट्रीय विक्रम
Published on

नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गानजीकच्या नेरुळच्या सेक्टर २६ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून २८.५ फूट इतक्या उंचीची भव्यतम फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या शिल्पाकृतीची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदवणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

अनेक समुद्र ओलांडून नवी मुंबईत येणारे रोहित पक्षी (फ्लेमिंगो) हे नवी मुंबईचे आकर्षण स्थान आहे. नवी मुंबईच्या खाडी किनारी वर्षातील दीर्घकाळ वास्तव्य करणारे फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षीप्रेमी व नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेने शहराची ‘फ्लेमिंगो सिटी’ ही ओळख दृढ करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोची आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात आली असून अनेक ठिकाणी फ्लेमिंगोच्या शिल्पाकृती बसविण्यात आलेल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in