राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत घेतली बैठक

मुंबईत गेल्या ३० वर्षांत अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. १९९३मध्ये बॉम्बस्फोट झाले होते
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत घेतली बैठक

पाकिस्तानातून २६/११ सारखा मुंबईवर हल्ला करण्याची दिलेली धमकी आणि रायगड येथे बोटीत तीन ‘एके-४७’ सापडल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी त्यांनी मुंबईच्या सुरक्षेबाबत चर्चा करत आढावा घेतला.

मुंबईत गेल्या ३० वर्षांत अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. १९९३मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर २००६मध्ये रेल्वेत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते, तर २६ नोव्हेंबर २००८ रोजी सागरी मार्गाने येऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईच्या हॉटेल ताज, ऑबेरॉय हॉटेलवर हल्ला केला होता. मुंबई पोलिसांची क्षमता पाहता अखेर एनएसजी कमांडोंना त्यांचा बीमोड करायला पाचारण करावे लागले. या कमांडोंनी तीन दिवसांत या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. मुंबईवर आजही दहशतवादाचे सावट कायम आहे.

गेल्याच महिन्यात पाकिस्तानातून एका दूरध्वनीवरून मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारसह केंद्र सरकार खडबडून जागे झाले. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मुंबईत दाखल होताच अनेकांच्या मनात चिंतेची पाल चुकचुकू लागली. कारण सबळ गंभीर कारण असल्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अचानक मुंबई दौऱ्यावर येऊ शकणार नाहीत, असाच सर्वांचा कयास आहे.

डोवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांच्यासोबत त्यांनी पोलीस महासंचालक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर डोवाल यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही डोवाल यांनी भेट घेतली. राजभवनने याबाबतच्या भेटीचे छायाचित्रही प्रसिद्ध केले; मात्र दोघांच्या चर्चेचा तपशील देण्यास राजभवनने असमर्थता व्यक्त केली.

सुरक्षेबाबत चर्चा झाली

गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, २६/११ सारखा हल्ला मुंबईत पुन्हा करण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांनी सुरक्षेबाबत चर्चा केली. ‘अल-कायदा’चा म्होरक्या आयमन-अल-जवाहिरीने नुकताच दिलेला इशारा पाहता त्यांचे दहशतवादी भारतात कार्यरत असण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार उभे आहे, हा या भेटीचा मुख्य हेतू होता. गणपतीनंतर नवरात्री, दसरा, दिवाळी हा उत्सवांचा काळ येतो. शिंदे-फडणवीस सरकारने हे सण कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरे करायला मिळतील, अशी घोषणा केली आह

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in