Mumbai : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद

बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री (ई-फार्मसी) आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून सुरू असलेल्या अनैतिक व्यावसायिक स्पर्धेच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार २० मे रोजी 'कडकडीत बंद' पुकारला आहे.
Mumbai : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद
Mumbai : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री (ई-फार्मसी) आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून सुरू असलेल्या अनैतिक व्यावसायिक स्पर्धेच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार २० मे रोजी  'कडकडीत बंद' पुकारला आहे. यामध्ये देशातील तब्बल १२.५० लाख आणि महाराष्ट्रातील सव्वा लाख औषध विक्रेते पूर्ण ताकदीने उतरणार आहेत.

Mumbai : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद
Mumbai : ऑनलाइन फार्मसीमुळे स्थानिक औषध विक्रेते संकटात; २० मे रोजी देशव्यापी संप

'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स'  आणि 'महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन'  या संघटनांनी या आंदोलनाची अधिकृत घोषणा केली आहे. या प्रश्नात प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता दाखवली जात असल्याने, अखेर औषध विक्रेत्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे, असे संघटनांचे म्हणणे आहे. देशात आणि राज्यात सध्या बनावट औषधे तयार करणारी 'ड्रग माफिया' गँग सक्रिय झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in