Navale bridge accident : मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची ४८ गाड्यांना दिली धडक

पुण्यातील नवले पुलावर (Navale bridge accident) झालेल्या अपघातात तब्बल २० जण जखमी झाले असून मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
Navale bridge accident : मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची ४८ गाड्यांना दिली धडक

पुण्यातील नवले पुलाच्या (Navale bridge accident) रस्त्यावर रविवारी भीषण अपघात झाला. वेगाने जात असलेल्या चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने कंटेनरने अंदाजे ४८ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश

"पुण्यातील नवले ब्रिज येथे टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहे. या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत." असे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

नक्की घडले काय?

आंध्र प्रदेशमधील मालवाहतूक करणारा एक कंटेनर रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रिज परिसरातील दरी पूल पार केल्यानंतर कंटेनर नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. कंटेनरने समोरून येणाऱ्या कार आणि रिक्षा यांना धडक दिली. हा ट्रक ४०० ते ५०० फूट गेला. वाहनांना धडकून थांबल्यानंतर चालक कंटेनर सोडून पसार झाला. वाहनांत अनेक चालक अडकून पडले पोलिसांनुसार अपघातग्रस्त वाहनांत अनेक चालक अडकून पडल्याने गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in