नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देणार

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार १२.५ टक्के योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार १२.५ टक्के योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले २२.५ टक्के योजनेचे धोरणसुद्धा १२.५ टक्के धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून १,१६० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतिपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in