जागर आदिशक्तिचा! सातरस्ता माऊलीचे दर्शन घेताच मन प्रसन्न; सामाजिक उपक्रमाचा ६२ वर्षांपासूनचा वारसा कायम

Navratri 2024: सातरस्ता माऊली यंदा आई तुळजाभवानी मातेचा देखावा साकारण्यात आला आहे. सातरस्ता माऊलीचे विशेष महत्त्व म्हणजे राज्यभरातील भक्तासह मराठी सिने कलाकार देवीच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात.
जागर आदिशक्तिचा! सातरस्ता माऊलीचे दर्शन घेताच मन प्रसन्न; सामाजिक उपक्रमाचा ६२ वर्षांपासूनचा वारसा कायम
Published on

मुंबई : सातरस्ता माऊली यंदा आई तुळजाभवानी मातेचा देखावा साकारण्यात आला आहे. सातरस्ता माऊलीचे विशेष महत्त्व म्हणजे राज्यभरातील भक्तासह मराठी सिने कलाकार देवीच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात. सात रस्ता माऊली यंदा ६२ वर्षांत पदार्पण करत असून यंदाही आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन केल्याचे सातरस्ता माऊलीचे सचिव आशीष नरे यांनी `दैनिक नवशक्ति`ला सांगितले.

सात माऊली नवरात्रौत्सवात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत आली आहे. कलादिग्दर्शक देवेंद्र रेडिज यांनी यंदा आई तुळजाभवानी मातेचा देखावा साकारला आहे. सातरस्ता माऊली व्यवस्थापनाकडे देवीची मूर्ती साकारण्यासाठी स्वतःचा साचा आहे. त्यामुळे मनमोहन आकर्षक देवीची मूर्ती आम्ही स्वतःच साकरतो. सात रस्ता माऊली देवी इतकी आकर्षक आहे की भारतभरातून देवीची मूर्ती बनवून देण्याची मागणी सातत्याने होत असते, असेही नरे यांनी सांगितले.

दरवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या संख्येने भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. यात मराठी सिने कलाकार मोठ्या संख्येने येतात. नऊ दिवस नऊ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सात रस्ता माऊली कडून विशेष काळजी घेतली जाते, असेही ते म्हणाले.

सातरस्ता माऊली देवीचे विशेष महत्त्व म्हणजे जिवंत बाईच आपल्या समोर बसली आहे, अशी अनुभूती येते. मुर्तीकार विशाल शिंदे आणि अमय कांदळगावकर यांनी ही मुर्ती साकारली आहे.

कोळी महिलांना मान

दरवर्षी नवरात्रौत्सवात मुंबईतील कोळी महिला एक दिवस देवीची ओटी भरण्यासाठी येतात. या दिवशी आई एकवीरा देवीचे रुप देण्यात येते. यंदा शुक्रवारी मुंबईतील कोळी बांधव देवीची ओटी भरण्यासाठी येणार असल्याची माहिती आशीष नरे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in