खासगी रुग्णालयात उपचारास नवाब मलिकांना न्यायालयाची परवानगी मिळाली

खासगी रुग्णालयात उपचारास नवाब मलिकांना न्यायालयाची परवानगी मिळाली

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला आहे.

मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. मात्र, उपचारासह पोलीस बंदोबस्ताचा खर्चदेखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.

नवाब मलिकांनी वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जात नवाब मलिक यांनी कोर्टाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.

नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचे जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचे समोर आले होते. नवाब मलिक खूप आजारी असल्याचे सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.

Related Stories

No stories found.