नवाब मलिकांच्या नियमित जामिनावर ३० ऑक्टोबरला सुनावणी

सर्वाच्च न्यायालयाने दोन महिन्याचा वैद्यकीय जामीन मंजूर केला
नवाब मलिकांच्या नियमित जामिनावर ३० ऑक्टोबरला सुनावणी

मुंबई : कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचे निश्चित केली. मलिक यांच्या वकिलांनी नियमित जामीन याचिकेवर गुणवत्तेच्या आधारे लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. याची दखल घेत न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी याचिकेची सुनावणी ३० ऑक्टोबरला घेण्याचे निश्‍चित केले.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. ते किडनी विकाराने त्रस्त असल्याने त्यानी नियमित जामिनाबरोबरच वैद्यकीय कारणास्तव जामीन अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने वैद्यकिय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला; मात्र सर्वाच्च न्यायालयाने दोन महिन्याचा वैद्यकीय जामीन मंजूर केला.

logo
marathi.freepressjournal.in