अजितदादा अस्वस्थ आहेत, राज्यात काहीही होऊ शकते; शिंदे गटातील मंत्र्याचे सूचक विधान

गेले काही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा असताना शिंदे गटातील मंत्र्याने केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या
अजितदादा अस्वस्थ आहेत, राज्यात काहीही होऊ शकते; शिंदे गटातील मंत्र्याचे सूचक विधान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नॉट रिचेबल झाले आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. अजित पवार आणि काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. यादरम्यान सर्वांना पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी ताज्या झाल्या. यानंतर तब्येत बरी नसल्याने विश्रांती घेत होतो, असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, अद्यापही यावर चर्चा सुरु असून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे म्हणाले की, "अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहेत. अजितदादा पवार हे अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादा अस्वस्थ असल्याचे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते." असे सूचक विधान त्यांनी केले. पुढे ते इंदू मिलबद्दल बोलताना म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी सगळ्यांचीच मागणी आहे. गेल्या काळात ते काम सुरूही झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कामाची पाहणी केली असून मला वाटते की, ते काम लवकरच पूर्ण होईल." अशी माहिती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in