
आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी हल्ला केला. या हल्ल्याचा राज्यभर निषेध करण्यात येत असून अनेक नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध केला. यावर आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, "राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आहे हे वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत वापरतात. मुख्यमंत्र्यांचे हेच वाक्य वापरून सर्वसामान्यांचे सरकार असल्यावर असेच होणार" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, मनसे नेते अमेय खोपकर यांनी यामध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा अशी मागणी केली आहे. तर, भाजपकडूनही या हल्ल्याचा निषेध केला असून आमदार नितेश राणे यांनी चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली आहे. यामध्ये राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपास वेगाने सुरु केला आहे.