"रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र..." अमोल मिटकरींनी लगावला राज ठाकरेंना टोला

आज रामनवमीदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ट्विट करत टोला लगावला
"रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र..." अमोल मिटकरींनी लगावला राज ठाकरेंना टोला

आज देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम नवमी जोरदार साजरी करण्याचे आवाहन केले होते. यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांना ट्विट करत टोला लगावला आहे. रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन स्वतः परदेशात पळाले, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे की, "रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित 'हिंदु जननायक' परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात, 'हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा." दरम्यान, गुढीपाडवादिवशी दादरमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी, रामनवमी जोरात साजरी करण्याचे आवाहन केले होते.

logo
marathi.freepressjournal.in