Anil Deshmukh : 'माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही' ; तुरुंगाबाहेर येताच काय म्हणाले अनिल देशमुख?

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज तुरुंगातून सुटका झाली. यावेळी पक्षाचे सर्व दिग्गज नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
Anil Deshmukh : 'माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही' ; तुरुंगाबाहेर येताच काय म्हणाले अनिल देशमुख?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज तुरुंगातून सुटका झाली. त्यांच्या स्वागतासाठी यावेळी पक्षाचे अनेक दिग्गज उपस्थित होते. तसेच, आर्थर रोड तुरुंगाबाहेर त्यांच्या कुटुंबीयांसहित हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी आभार येताच त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, "माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. परमवीर सिंग यांनी ऐकीव माहितीवरून माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते." यावेळी आभार येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुखांना पेढे चारत आनंद व्यक्त केला आणि त्यांचे स्वागत केले.

अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, "मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी न्यायालयात जाऊन प्रतिज्ञापत्र दिले, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही, असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर न्यायालयाच्या निर्णयामध्ये जे निरीक्षण केले आहे, त्यामध्ये परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहे. अशा आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. सचिन वाझेला आतापर्यंत दोन खूनाच्या आरोपांखाली अटक झाली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला. मी त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in