"राज ठाकरे मुख्यमंत्री तर मी पंतप्रधान"; राष्ट्रवादीच्या या नेत्याने लगावला टोला

आज शिवसेना भवनाबाहेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधणारे एक फलक लावल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली
"राज ठाकरे मुख्यमंत्री तर मी पंतप्रधान"; राष्ट्रवादीच्या या नेत्याने लगावला टोला

आज गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेणार आहेत. यानिमित्ताने आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचे पोस्टर मनसेने लावले होते. यामध्ये एका पोस्टरची चांगलीच चर्चा झाली. शिवसेना भवनबाहेर लावलेल्या एका मनसेच्या पोस्टरवर राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री असे संबोधले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री आहेत, असे त्यांना वाटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते, मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे." असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

आज गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर मोठी सभा घेणार आहेत. अशामध्ये या पाडवा मेळाव्याची मनसैनिकांकडून जोरदार तयारी आहे. यावेळी भावी मुख्यमंत्री म्हणून लावलेल्या पोस्टरची संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा झाली. राजकीय वर्तुळातही यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, "राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर कोणाला आवडणार नाही. आम्ही त्याच दिवसाची वाट पाहतो आहोत." अशी भावना मनसे नेते नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. खासदार संजय राऊत यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in