राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा

शरद पवार यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला असला तरी अजित रावराणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहयोगी म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई महापालिकेत शिंदे सेनेची ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा
राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा
Published on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यापैकी अजित रावराणे दिंडोशी विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक ४३ मधून निवडून आले आहेत. शरद पवार यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला असला तरी अजित रावराणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहयोगी म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई महापालिकेत शिंदे सेनेची ताकद वाढली आहे. दरम्यान, प्रभागातील कामे पूर्ण करणे, लोकांचे प्रश्न सोडवणे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या सेनेला सहयोगी म्हणून पाठिंबा दिल्याचे अजित रावराणे यांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे), मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली. आता महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी ठाकरे बंधूंची साथ सोडली आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दाची निवडणूक ११ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी शनिवारी, ७ फेब्रुवारी २०२६ ला अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in