राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचे केले कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. तात्याराव लहाने यांचे केले कौतुक

डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना दृष्टी दिली, या सार्‍या गोष्टीं अद्भुत होत्या. एखाद्या अंध व्यक्तीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि तो पहिल्यांदा जग पाहतो, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा अनेकांच्या चेहर्‍यावरचा डॉ. लहानेंनी हास्य फुलविल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. लहाने यांनी यांचे कौतुक केले.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अमित देशमुख, मंत्री सुनील केदार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होते. डॉ. लहाने यांच्या कार्याला सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

गेली अनेक वर्षे नेत्रचिकित्सा करताना अनेक रुग्णांना नवी दृष्टी दिली. त्यावेळी त्यांनी पैशाची अपेक्षा केली नाही. डॉ. लहानेंमार्फत आता हे नवीन नेत्रालय उभे राहत आहे. ही आपल्या राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फतही गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला.

डॉ. लहाने यांनी आतापर्यंत जवळपास पावणे दोन लाख डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्या. दरम्यान त्यांनी ज्यावेळी ते एक लाखावी शस्त्रक्रिया करणार होते. त्या दिवशी विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. ते आपल्या ४-५ मंत्र्यांना घेऊन रुग्णालय आले आणि त्यांनी तात्यारावांनी केलेली लाखावी शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये बसून पाहिली, अशी माहिती विलास राव देशमुख यांचे सुपुत्र आणि राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in