राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही-अजित पवार

शिवसेनेच्या बंडाळीत भाजपचा कोणताही मोठा नेता हस्तक्षेप करतो आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही-अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या बंडाळीत भाजपचा कोणताही मोठा नेता हस्तक्षेप करतो आहे, असे सध्या तरी दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार यांची बैठक बोलाविली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. आघाडी सरकारला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा कायम राहणार आहे. राज्यात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. संजय राऊत यांनी आघाडीबाबत जे विधान केले, हे त्यांच्या पक्षांतर्गत बाबींमुळे केले आहे. कदाचित गेलेले आमदार परत यावेत, यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्याबाबत आम्हाला कोणतीही टीकाटिप्पणी करायची नाही,’’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in