प्रकल्प बाधितांसाठी ७५ हजार सदनिकांची गरज; टप्याटप्याने पालिका सदनिका बांधणार

मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरु असून प्रकल्प बाधितांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
प्रकल्प बाधितांसाठी ७५ हजार सदनिकांची गरज; टप्याटप्याने पालिका सदनिका बांधणार
Published on

मुंबई : नाला रुंदीकरण, रस्ता रुंदीकरण, पूल बांधणे अशी विविध कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहेत. या कामात बाधित पात्र नागरिकांना घर उपलब्ध करुन देणे पालिकेची जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रकल्प बाधितांचा आकडा वाढला असून प्रकल्पग्रस्तांसाठी ७४७५२ सदनिकांची गरज आहे. प्रकल्प बाधितांना पर्यायी व्यवस्था म्हणून टप्याटप्याने सदनिका बांधण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार धारावीतील अपात्र झोपडीधारकांना भाडेतत्वार घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत तर पात्र झोपडीधारकांना मोफत घरे दिली जातील. यासाठी मुंबई पालिकेची मुलुंड येथील ४६ एकर जमीन आणि मुलुंड जकात नाका येथील १८ एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात यावी, असे निर्देश गृहनिर्माण विभागाने नगरविकास विभाग आणि पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे प्रकल्प बाधितांसाठी ७४ हजार सदनिकांची गरज असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरु असून प्रकल्प बाधितांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तर विविध प्राधिकरणांकडून फक्त २,११३ पुनर्वसन सदनिका प्राप्त झालेल्या आहेत. तर पालिकेचे स्वतःचे भूखंड विकसित करुन ३,०९१ नवीन पुनर्वसन सदनिका बांधण्यात आल्या आहेत. परंतु ३५ हजार पुनर्वसन सदनिकांची गरज होती. आता तब्बल ७४,७५२ निवासी सदनिकांपर्यंत वाढल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in