नीट उत्तीर्ण युवक बनला रेल्वेतला चोर

मोबाईलवरील ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे एका नीट परीक्षा उत्तीर्ण तरुणाने शिक्षण अर्धवट सोडले आणि प्रवाशांचे सामान चोरून त्याने आपल्या व्यसनाची पूर्तता केली.
नीट उत्तीर्ण युवक बनला रेल्वेतला चोर
Published on

मुंबई : मोबाईलवरील ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे एका नीट परीक्षा उत्तीर्ण तरुणाने शिक्षण अर्धवट सोडले आणि प्रवाशांचे सामान चोरून त्याने आपल्या व्यसनाची पूर्तता केली. रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असताना या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर रेल्वे पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपीचे नाव तुफैल रजा अख्तर मेमन (२५) असे असून तो लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरायचा. विशेष पथकानुसार, तुफैल रजा अख्तर मेमन मूळचा धुळे जिल्ह्यातील असून, नीट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी ठाण्याजवळील मुंब्रा येथे राहायला आला होता.

logo
marathi.freepressjournal.in