हेरिटेज दर्जा प्राप्त, तरीही सरकारचे दुर्लक्ष; बार देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी; ११ फूट उंच प्राचीन महादेवाची मूर्ती भक्तांचे श्रद्धास्थान

मुंबईत पुरातन वास्तू, शिल्प, मंदिर कलाकृती आहेत. त्यापैकी एक परळ शिवडी येथील बार देवी मंदिर. १९३१ मध्ये शिवडी येथील आचार्य दोंदे मार्गावरील डोंगराचे खोदकाम सुरू असताना सहाव्या शतकातील ११ फूट उंच आणि पाच फूट रूंद महादेवाची मूर्ती सापडली. हेरिटेज कमिटीने महादेवाची मूर्ती हेरिटेज असल्याचे जाहीर केले.
हेरिटेज दर्जा प्राप्त, तरीही सरकारचे दुर्लक्ष; बार देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी; ११ फूट उंच प्राचीन महादेवाची मूर्ती भक्तांचे श्रद्धास्थान
हेरिटेज दर्जा प्राप्त, तरीही सरकारचे दुर्लक्ष; बार देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी; ११ फूट उंच प्राचीन महादेवाची मूर्ती भक्तांचे श्रद्धास्थानसौजन्य - गिरीश चित्रे
Published on

मुंबईत पुरातन वास्तू, शिल्प, मंदिर कलाकृती आहेत. त्यापैकी एक परळ शिवडी येथील बार देवी मंदिर. १९३१ मध्ये शिवडी येथील आचार्य दोंदे मार्गावरील डोंगराचे खोदकाम सुरू असताना सहाव्या शतकातील ११ फूट उंच आणि पाच फूट रूंद महादेवाची मूर्ती सापडली. हेरिटेज कमिटीने महादेवाची मूर्ती हेरिटेज असल्याचे जाहीर केले. प्राचीन मूर्तीची हळूवार प्रसिद्धी झाली आणि आजही महादेवाची मूर्ती भक्तांचे श्रद्धास्थान बनली आहे. मात्र काळाच्या ओघात या प्राचीन महादेवाच्या मूर्तीकडे मुंबई महापालिका, राज्य सरकार अथावा केंद्र सरकारचा हेरिटेज विभाग या सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. हेरिटेज वास्तूंचे जतन करणे काळजी गरज आहे. त्यामुळे बार देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लावून धरली आहे.

अतिवृष्टी असो वा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती मुंबईला तारले मुंबईतील देवी-देवतांनी असे आजही बोलले जाते. मुंबईत प्राचीनकालीन अनेक मंदिरे असून त्यापैकी एक परळ शिवडी येथील बार देवी मंदिर. १९३१ साली परळ-शिवडी रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूकडील डोंगराचे खोदकाम सुरू केले. खोदकाम सुरू असताना ११ फूट उंच व पाच फूट सहा इंच रुंद महादेवाची मूर्ती सापडली. त्यानंतर २००६ मध्ये हेरिटेज कमिटीने देशभरातील प्राचीन वास्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी हेरिटेज कमिटीने परळ शिवडी येथील बार देवी मंदिरात स्थापन केलेल्या महादेवाच्या मूर्तीचा अभ्यास केला.

हेरिटेज कमिटीने ही मूर्ती प्राचीन असून ‘हेरिटेज-१’ असा दर्जा दिला. प्राचीन महादेवाच्या मूर्तीची स्थापना बार देवी मंदिरात करण्यात आली आणि हळूवार बार देवी मंदिरात या महादेवाची मूर्ती विराजमान असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि दर्शन घेण्यासाठी परळ शिवडीसह मुंबईतील विविध भागातील भक्तांची गर्दी होऊ लागली. मात्र कालांतराने महादेवाच्या मूर्तीकडे हेरिटेज कमिटी, राज्य सरकार सगळ्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे इ.स. ५०० व्या शतकातील प्राचीन महादेवाची मूर्ती आजही तशीच बार देवी मंदिरात आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हेरिटेज कमिटीने जातीने लक्ष घालत या मूर्तीची जोपासना करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

अनेक वर्षे लोटली तरी ऐतिहासिक दर्जा असलेली ही मूर्ती आजही तशीच आहे. केंद्र, राज्य व मुंबई महापालिकेच्या हेरिटेज कमिटीने याकडे जातीने लक्ष घालत मूर्तीची जोपासना आणि मूर्तीप्रति भक्तांमध्ये जनजागृती निर्माण केली पाहिजे, असे मत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केले.

शंकराच्या १२ अवतारांचे दर्शन!

मुंबई महानगरातील परळ गावात बाराव्या शतकातील पुरातन चंडिका देवी आणि वाघेश्वर देवीच्या शेजारी सहाव्या शतकातील बारा देव या मूर्तीचे दर्शन केवळ नवरात्रौत्सवात भक्तांसाठी खुले केले जाते. चंडिका देवी मंदिराच्या मागच्या आवारात बाराव्या शतकातील वीरगळ आहे. ही अकरा फुटांची दगडाची भव्य मूर्ती आहे. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात परळ ते शिवडी रस्त्याचे काम चालू असताना बार देवाची ही मूर्ती मिळाली आणि तेव्हापासून परळ गावात तिचे स्थान आहे. एकसंध दगडात कोरलेली बारा देवी मूर्ती या नावाने ओळखली जाते. एकाच मूर्तीमध्ये १२ प्रतिमा पेरलेल्या असल्यामुळे तिला बार देवी असे नाव देण्यात आल्याचे तेथील नागरिक सांगतात. विशेष म्हणजे बार देवीच्या ११ फुटी मूर्तीमध्ये शंकराच्या बारा अवतारांचे दर्शन घडते.

अशी आहे प्राचीनकालीन महादेवाची मूर्ती!

परळ येथील शिवाचे शिल्प ९ ऑक्टोबर १९३१ रोजी परळ-शिवडी रस्त्याचे खोदकाम करताना सापडले. हे शिल्प परळ गावात बारा देवी मंदिरात ठेवलेले आहे. ३.०६ मीटर उंचीचे हे शिल्प करड्या बेसाल्ट दगडात कोरले असून त्यात दर्शनी बाजूस विविध मुद्रांमध्ये सात देवता कोरलेल्या आहेत. या शिल्पात मध्यभागी तीन देवता एकमेकांच्या पाठी उभ्या असून दोन्ही बाजूंनी दोन देवता आहेत. खालील बाजूस पाच शिवगण वीणा, बासरी अशी वाद्ये वाजवताना दाखवलेले आहेत. मध्यभागी असलेली स्थानक मुद्रेतील शिवमूर्ती उत्तरीय नेसलेली असून डोक्यावर जटा मुकुट शोभत आहे. या मूर्तीच्या डाव्या हातात लहान भांडे / चंबू असून उजवा हात अभय मुद्रेत आहे. वरील बाजूस मध्यभागी असलेली देवता अष्टभुज असून हातात तलवार, ढाल आदी आयुधे आहेत. मूर्तीशास्त्राच्या आधारे हे शिल्प इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकात कोरलेले असावे.

logo
marathi.freepressjournal.in