नेरळ-माथेरान ‘टॉय’ट्रेन उद्यापासून सुरू

तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ-माथेरान मार्गाचे मोठे नुकसान झाले होते.
नेरळ-माथेरान ‘टॉय’ट्रेन उद्यापासून सुरू

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान ही ‘टॉय ट्रेन’ दिवाळीपूर्वी २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ-माथेरान मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नेरळ ते माथेरान दरम्यान टॉयट्रेन बंद होती. रेल्वेने या मार्गाची पुन्हा बांधणी केली. आता ही सेवा २२ तारखेपासून सुरू होईल. ही टॉयट्रेन पर्यटकांची अत्यंत आवडती आहे. नागमोडी वळणे घेत जाणाऱ्या या गाडीतून प्रवास करणे अवर्णनीय आनंद असतो.

नेरळवरून ही गाडी सकाळी ८.५० वाजता सुटून ती सकाळी ११.३० वाजता माथेरानला पोहचेल. तर २.२० वाजता नेरुळहून २.२० वाजता सुटून माथेरानला ५ वाजता पोहचेल.

तर माथेरानहून ही गाडी दुपारी २.४५ वाजता सुटून सायंकाळी ५.३० वाजता नेरळा पोहचेल. तर दुसरी गाडी दुपारी ४.२० वाजता सुटून नेरळला सायंकाळी ७ वाजता पोहचेल.

या गाडीला ३ द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम, २ द्वितीय श्रेणी कम सामान श्रेणीचे डबे असतील, असे मध्य रेल्वेने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in