मुंबई : जिओने नेटफ्लिक्स सबस्क्रीप्शनसोबत प्रीपेड प्लॅन आणले आहेत. ४० कोटी जिओ प्रीपेड ग्राहकांना हे प्लॅन मिळतील. १०९९ रुपयाचा रिचार्ज केल्यास ८४ दिवसांची वैधता मिळेल. त्यात नेटफ्लिक्स (मोबाईल), अमर्याद ५ जी डेटा, रोज २ जीबी डेटा, अमर्याद कॉलिंगचा समावेश असेल. तर १४९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळेल.
नेटफ्लिक्स (मोठी स्क्रीन), अमर्याद ५ जी डेटा, रोज ३ जीबी डेटा, अमर्याद कॉलिंगचा समावेश असेल. आमच्या ग्राहकांसाठी जागतिक दर्जाची सेवा पुरवण्यावर आम्ही कटिबद्ध आहोत, असे कंपनीचे सीईओ किरण थॉमस यांनी सांगितले