‘चुकीला माफी नाही’ म्हणुन नेटकर्यांनी अभिनेता कुशल बद्रिकेला मागायला लावली माफी

अभिनेता कुशल बद्रिकेने वेबसिरीज पाहिल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया लिहुन एक पोस्ट शेअर केली
‘चुकीला माफी नाही’ म्हणुन नेटकर्यांनी अभिनेता कुशल बद्रिकेला मागायला लावली माफी

रानबाजार ही वेबसिरीज सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या वेबसिरीजची उत्सुकता टिझर लाॅंच झाल्यापासुन प्रेक्षकांमध्ये होती. तसेच कलाकारांनीही या वेबसिरीजचे प्रमोशन जोरदार केले होते. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफाॅमवरील ही सिरीज प्रेक्षकांसोबत अन्य कलाकारांनीही बघितली. सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर पोस्ट केल्या. अभिजीत पानसे दिग्दर्शित ही सिरीज समाज, राजकारण व सामान्य माणुस यांच्यातील वास्तववादी चित्र दाखवते. वेगळ्या धाडणीच्या या वेबसिरीजमध्ये प्राजक्ता माळी, तेजस्वीनी पंडित व अन्य कलाकारांचे सोशल मिडीयावर कौतुक करण्यात आले. अभिनेता कुशल बद्रिकेने वेबसिरीज पाहिल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया लिहुन एक पोस्ट शेअर केली. परंतु या पोस्टमुळे कुशल बद्रिकेला माफी मागायला लागली आहे.

काय होती कुशल बद्रिकेची पोस्ट

या पोस्टमध्ये शब्दात कुशल बद्रिकेने System नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते हेच खर. अशा शब्दात वेब सिरीजचे व रानबाजारच्या संपुर्ण टीमचे कौतुक केले, परंतु संपुर्ण पोस्टमध्ये कुठेही अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले नाही, त्यामुळे कुशलला त्याची चुक नेटकर्यांनी दाखवुन दिली. प्राजक्तानेही इतर कलाकारांप्रमाणे चांगले काम केले आहे तु तिला कसा विसरलास? असा सवाल नेटकर्यांनी केला. त्यामुळे कुशलला दुसरी अजुन एक पोस्ट तयार करावी लागली.

काय आहे दुसरी पोस्ट ?

कुशलने सोशल मिडीयासमोर अभिनेत्री प्राजक्ता माळी ची जाहीर माफी मागितली. चुकून प्राजक्ताचे नाव लिहायचे राहुन गेले, त्यामुळे संपुर्ण न्युज मीडिया व स्पेशली प्राजक्ता माळीचे फॅन्स यांची मी क्षमा मागतो असे कुशलने लिहीले आहे. प्राजक्ता माझी सहकलाकार आहे व ती खुप चांगली मैत्रीणसुद्धा आहे, त्यामुळे पर्सनली तुझी माफी मागतो. असे म्हणत बद्रिकेने आपली चुक कबुल केली. बाकी सगळ्या कलाकारांसोबतच घुबडाने देखील भारी काम केले आहे असा विनोद देखील त्याने या पोस्ट मध्ये केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in