नवे सरकार हिंदुत्वच्या विचारांना पुढे नेणार - देवेंद्र फडणवीस

दुर्दैवाने निकालानंतर आमचा मित्र पक्ष असलेल्‍या शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला
नवे सरकार हिंदुत्वच्या विचारांना पुढे नेणार - देवेंद्र फडणवीस

भाजप-शिवसेनेच्या युतीने २०१९ ची निवडणूक एकत्र लढवत १७० जागा जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या उपस्‍थितीत भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणाही केली होती; मात्र दुर्दैवाने निकालानंतर आमचा मित्र पक्ष असलेल्‍या शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्‍यांचा विरोध केला, अशा काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. भाजपला सत्‍तेबाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता, असे देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्‍तेत आले. राज्‍याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्‍टाचाराच्या आरोपावरून जेलमध्ये जाणे ही खेदजनक बाब होती. ज्‍या बाळासाहेबांनी कायम देशाचा शत्रू असलेल्‍या दाउदचा विरोध केला. त्‍याच दाउदसोबत संबंध असल्‍याचे आरोप असलेल्‍या मंत्र्याला मंत्रीपदावरून काढण्यात आले नाही. नेहमीच हिंदुत्‍वाचा अपमान झाला. आम्‍ही सत्‍तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी भांडत नव्हतो. ही तत्‍वांची लढाई होती, असे फडणवीस म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in