"माझ्याशी संबंध ठेव नाहीतर...", सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर

आत्महत्या करण्याआधी सुधीर मोरे यांच्या मोबाईलवर एका महिलेने ५६ फोने केल्याची माहिती समोर आली आहे.
"माझ्याशी संबंध ठेव नाहीतर...", सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर

३१ ऑगस्ट रोजी घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी नगरसेवर सुधीर मोरे यांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. सुधीर हे विक्रोळी पश्चिम इथं राहत होते. त्यांच्या आत्महतेने सगळीकडे खळबळ उडाली होती.

आत्महत्या करण्याआधी सुधीर मोरे यांच्या मोबाईलवर एका महिलेने ५६ फोने केल्याची माहिती समोर आली आहे. ही खबर समजताच सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. या प्रकारात निलिमा चव्हाण या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. निलिमा चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. सुधीर मोरे यांना निलिमा यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे .

सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांच्या वतीने ही धक्कादायक माहिती न्यायालयात दिली आहे. इक्बाल सोलकर म्हणाले आहे की, "निलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना माझ्याशी संबंध ठेव जर नाही ठेवलेस तर जीवन संपवून टाकू अशी धमकी सुधीर मोरे यांना वारंवार देतं होत्या".

'इंडीयन एक्सप्रेसने' दिलेल्या वृत्तानुसार निलिमा चव्हाण आणि सुधीर मोरे या दोघांमध्ये ५६ वेळा कॉलवर बोलण झालं आहे. याशिवाय यांच्यात व्हॉट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल देखील करण्यात आले होते. कुर्ला पोलिसांनी याबाबतचा दावा केला आहे. सुधीर मोरे यांनी निलीमा यांना हा छळ थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी मोरे यांच्यावर कोणतीही दयामाया दाखवली नाही, अशी बाजू सरकारी वकीलांनी न्यायालयात मांडली असल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in