मुंबई विभागातील 'या' रेल्वे स्थानकांना नवीन लूक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला भूमिपूजन

अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५६ स्थानके विश्व रेल्वे स्टेशनच्या रूपात विकसित करण्यात येणार आहेत.
मुंबई विभागातील 'या' रेल्वे स्थानकांना नवीन लूक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला भूमिपूजन

मुंबई : अमृत भारत योजनेंतर्गत देशभरातील १,३०९ स्थानकांचा जागतिक दर्जाच्या टर्मिनल्समध्ये रूपांतरित केले जाणार असून ट्रॅव्हल हबचे होणार आहे. यात मुंबई विभागातील १२ स्थानकांचा कायापालट होणार आहे. यात भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी ही स्थानके आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ लिंकद्वारे भूमिपूजन होणार आहे. या वर्षाच्या केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राला १५५५४ कोटी रुपयांचा रेकॉर्ड निधी मिळाला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५६ स्थानके विश्व रेल्वे स्टेशनच्या रूपात विकसित करण्यात येणार आहेत.

भायखळा : प्रकल्प खर्च - ३५.२५ कोटी

नवीन बुकिंग कार्यालय बांधणे.

डिजिटल जाहिरात स्क्रीनसह फ्लोअरिंग आणि एसीपी क्लॅडिंग बदलणे.

सँडहर्स्ट रोड : प्रकल्प खर्च - १६.३७ कोटी

सध्याच्या बुकींग कार्यालयाचे नूतनीकरण

चिंचपोकळी : प्रकल्प खर्च - ११.८१ कोटी

मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा

वडाळा रोड : प्रकल्प खर्च - २३.०२ कोटी

नवीन गेट, एसीपी शीट आणि एलईडी दिवे असलेले बुकिंग ऑफिस प्रस्तावित आहे.

माटुंगा : प्रकल्प खर्च - १७.२८ कोटी

फलाट ३/४ वर प्लॅटफॉर्मची उभारणी, पुनरुत्थान

कुर्ला : प्रकल्प खर्च - २१.८१ कोटी

अपंगांसाठी अनुकूल तिकीट खिडकीसह विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण

विद्याविहार : प्रकल्प खर्च - ३२.७८ कोटी

सीएसएमटीच्या दक्षिणेस टोकावर ६.०० मीटर रुंद नवीन फूट ओव्हर ब्रीजची तरतूद, २ एस्केलेटरची तरतूद

मुंब्रा : प्रकल्प खर्च - १४.६१ कोटी

विद्यमान बुकिंग ऑफिस, टॉयलेट ब्लॉक्सचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्याच्या कारंजाची व्यवस्था

दिवा : प्रकल्प खर्च - ४५.०९ कोटी

सीएसएमटी स्थानकातील टोकावर १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रीजची तरतूद, आरसीसी कंपाऊंड वॉल

शहाड: प्रकल्प खर्च - ८.३९ कोटी

पादचाऱ्यांच्या रोड ओव्हर ब्रीज ते पादचारी पुलापर्यंत नवीन स्कायवॉक, पूर्व आणि पश्चिम बाजूला प्रशस्त पार्किंगची जागा

टिटवाळा : प्रकल्प खर्च - २५.०५ कोटी

विद्यमान ६ मीटर फूट ओव्हर ब्रिजला नवीन १२ मीटर पादचारी पुलाला जोडणाऱ्या नवीन १२ मीटर पादचारी पूल तरतूद, सर्व प्लॅटफॉर्मची उंची १५० मिमीपर्यंत वाढवणे

इगतपुरी : प्रकल्प खर्च - १२.५३ कोटी

जीआरसी जाळी असलेले मुख्य प्रवेशद्वार, ड्रॉप ऑफ आणि पिकअप स्थान

logo
marathi.freepressjournal.in